0
1
8
3
2
0
वाढदिवस तुझा
चौदा सप्टेंबर अविस्मरणीय
दिन बाळाच्या वाढदिवसाचा
ड्रेस, केक, सजावट नि मेनू
किती उत्साह तुझा दिसायचा..!!
सर्व काही तुझ्या आवडीचे
सर्वांना आनंद व्हायचा खूप
सकाळी सकाळी गोड शिरा
बनविण्यासाठी साजूक तूप…!!
तुला आनंदी पाहून मजला
उंच आभाळ ठेंगणे वाटायचे
जन्मापासून सर्व बाललीला
कौतुक करताना ऊर दाटायचे..!!
क्रूर नियतीने घात करून
श्रीकृष्ण क्षणात हिरावला
काळजाचा तुकडा मिठ्ठित
कुशीतच श्वास स्थिरावला…!!
वाढदिवस तुझा येताक्षणी
आनंदाचा महासागर आटला
असह्य विरह वेदनांनी बाळा
अश्रुंचा महापूर नयनी दाटला..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
0
1
8
3
2
0