
0
5
2
2
6
4
ताळेबंद
मार्च सरत आला की
की प्रश्न ताळेबंदाचा
वाजला नगारा चैत्री
चैत्री गुढीपाडव्याचा ||
ताळमेळ घालू आता
आता सरत्या वर्षाचा
ताळेबंद पाहू जरा
जरा मेळ हिशोबाचा ||
आले किती गेले किती
किती कमवावे अती
हाव पैशाची सोडून
सोडून सांभाळ नाती ||
दया,क्षमा,शांती सूत्र
सूत्र तुझ्या प्रगतीचे
नाते अभंग ठेव तू
तू सदा माणुसकीचे ||
जीवनात ताळेबंद
ताळेबंद अनमोल
ताळेबंदाविना सारे
सारेच कवडीमोल…..
सारेच कवडीमोल….. ||
दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
उमरगा जि.धाराशिव
0
5
2
2
6
4



