विलास झोडापे यांनी दाखल केला नामांकन अर्ज
रजत डेकाटे- प्रतिनिधी
विलास झोडापे यांनी दाखल केला नामांकन अर्ज
रजत डेकाटे- प्रतिनिधी
मालेवाडा /भिवापूर
नागपूर: आगामी विधानसभेच्या निवडणुका करीता उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरेड विधानसभा मतदार संघात २ लाख ९६ हजार इतकी लोकसंख्या असलेल्या या उमरेड विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून विलास झोडापे यांनी आपला नामांकन अर्ज उमरेड येथील तहसील कार्यालयात दाखल केला.
विलास झोडापे यांनी २००९ मध्ये उमरेड विधानसभेची निवडणूक लढली होती. २०१२ बिनविरोध चनोडा ग्रामपंचायत वर निवडून आले. त्यानंतर २०१९ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढली २००मतांनी झोडापे यांचा पराभव झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी पक्षाकडे मागणी केली होती.
नुकतीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला होता.
मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र ते पुन्हा नव्याने जोमाने कामाला सुरुवात केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत ”फटे जरुर है लेकीन मैदान में दटें है” विलास झोडापे यांनी म्हटलेला शेर उमरेड विधानसभा क्षेत्रात चांगला गाजला होता. आणि विलास झोडापे यांच्या या शेरशायरीची चर्चा आता पुन्हा एकदा नागरिकांतून जोर धरू लागली आहे.



