Breaking
कविताचंद्रपूरविदर्भसाहित्यगंध

एक होती परी

पुष्पा डोनीवार बाबुपेठ,चंद्रपूर

0 4 8 2 9 4

एक होती परी

एक होती परी
होती छोटीशी सुंदर
बाहुली सारखी जणू ती
घारे डोळे नाक नक्षीदार

स्वप्नात माझ्या अधूनमधून
इवले इवले पंख हलवीत
हळूच चाहूल टाकीत
येऊन मला उठवित

स्मित हास्य गालावरती
गोल बोलती माझ्याशी ती
म्हणती मी तुझी सखी परी
सांगना काय हवे ते तुला देती

मी म्हणाले सुंदरशी लेखणी हवी
तथास्तु म्हणून लेखणी दिली
हसत खेळत नाचत आनंदात
छोटीशी सुंदर परी निघून गेली

तेवढ्यात मज जाग आली
ती भुर्रकन उडून गेली परी
अरे मी तर स्वप्न बघत होते
अशी एक होती परी न्यारी

पुष्पा डोनीवार
बाबुपेठ,चंद्रपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे