वयातील फरक व माणसाचे विचार
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि.पुणे

वयातील फरक व माणसाचे विचार
जेव्हा लहान होतो (2 ते 5 वर्षे ) निष्पापपणा होता, निरपेक्ष, निर्मळ स्वभाव होता. तेव्हा पिणे म्हणजे काय? तर फक्त रसना, लिंबू सरबत एवढेच आपल्याला माहीत होतं. सिनेमा पाहून सिनेमातले हिरो आपला हिरो असे वाटायचे, पण आपला जीवनातलं हिरो कोण? तर आपला हिरो म्हणजेच आपला बाबाच होता. आपल्या बाबासारखे आपण व्हावे असेच वाटायचे. जेव्हा प्रेमाची व्याख्या समजायला लागली त्या वेळेला माझी आई आणि माझ्या आईची ती पहिली मिठी, तिची झप्पी एवढेच फक्त माहीत होतं.
गणपती उत्सव, शिवजयंती अशा उत्सवाला गेल्यानंतर गर्दीमुळे आपल्याला दिसत नसताना बाबांच्या खांद्यावर बसून जेव्हा समोरचे दृश्य पाहायचे तेव्हा असे वाटायचे की सगळ्यात उंच आपणच आहोत. जेव्हा ड्रामा म्हणजे काय हे समजायला लागलं, तेव्हा फक्त नाटकातलच पात्र असं वाटायचं. खोटे पोटात दुखणे म्हणजे शाळेला बुट्टी मिळेल असा ड्रामा करायचा. जेव्हा औषध म्हणून समजायला लागलं तेंव्हा तुळशीची पानं, कोरफड, विड्याची पानं, लवंग वेलची यांचा आईने बनवलेला काढा एवढेच समजायला लागलं.
आता दुखणे म्हणजे काय हे जेव्हा समजायला लागले तेव्हा फक्त रस्त्यावर जाताना, खेळताना फुटलेले गुडघे नजरेसमोर आले. जेव्हा युद्ध शब्द समजायला लागला तेव्हा फक्त खेळातीलच युद्ध असं वाटायचं. घरातली भांडण आठवायची. बघा ना! किती सुंदर क्षण ते. आयुष्य सरळ साध आणि सोपं होतं. आता आपण मोठे झालो. प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण वेगळा घेऊ लागलो.
1) निष्पापपणा आता आपल्याला पाहायला मिळत नाही. निरागस, निर्मळ,पवित्र मन कोणाचेच राहिलेले नाही. अगदी बोटावर मोजण्या इतकी माणसं निष्पाप राहिली आहेत.
2) पिणे हा शब्द मोठा झाल्यानंतर अनेक पेय नजरेसमोर येतात. ज्याने संसार विकोपाला जातात.
3) लहान असताना वडील आपले हिरो असायचे; पण मोठे झाल्यानंतर आपल्याला आवडता हिरो जो तोच बनण्याची स्टाईल सुरू झाली.
4) मोठे झाल्यानंतर प्रेमाची व्याख्या बदलली. पुरुषाला स्त्रीचे आकर्षण वाढले, स्त्रीला पुरुषाचे आकर्षण वाढले.
5) उंची या शब्दाचा अर्थ जरा मोठे झाल्यानंतर कळाल्यानंतर त्या वेळेला उंची वस्त्र, उंची दागिने, मोठ्या मोठ्या इमारती, विविध प्रकारची वाहने इत्यादी बद्दल आकर्षण वाढले.
6) ड्रामा या शब्दाचा अर्थ मोठे झाल्यानंतर वेगळाच अर्थ निघायला लागला. समाजामध्ये सर्रास नाटके करून पैसा कसा कमवावा? आपण विश्वास कसा संपादन करावा? या चाली सुरू झाल्या. फसवा फसवी सुरू झाली.
7) औषधांबद्दल सांगायलाच नको. कारण हल्ली माणसांची लाईफस्टाईल एवढी प्रचंड प्रमाणात बदललेली आहे की डायबेटीस,बीपी,कॅन्सर प्रत्येक घराघरात असल्यामुळे औषध प्रत्येक घरात आहेत.
8) युद्ध ह्या शब्दाची तर संकल्पनाच बदललेली आहे. देशा देशातील युद्ध आता आपण सर्रास टीव्हीवर पाहतो. त्याचा दुष्परिणाम पण भोगतो.
वय वर्ष साधारण दोन पासून पाच पर्यंत आणि वय वर्ष 18 च्या पुढील समज फरक साधण्याचा प्रयत्न केला आहे.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे





