छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करणाऱ्यांनो भाग जाओ पाकीस्तान,
आमदार संतोष बांगर यांचा विरोधकांवर टोला
छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करणाऱ्यांनो भाग जाओ पाकीस्तान,
आमदार संतोष बांगर यांचा विरोधकांवर टोला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर जेसिपीच्या साह्याने फुलांची उधळण.
जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली:(दि.६) हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात आज कळमनुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याची शहरातुन वाजतगाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जेसिपीच्या साह्याने फुलांची उधळण करत शिवप्रेमींनी भव्य स्वागत केले कळमनुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा शोभायात्रा व भुमिपुजन सोहळ्याला नागरीक, महिलांनी मोठी गर्दी केली होती तर दुसरीकडे ईतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला अनुपस्थित होती यामुळे यावेळी आमदार संतोष बांगर यांनी विरोधकांवर टिका करतांना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्यांनो तुम्हाला हिंदुस्थानात राहण्याची गरज नाही तुम्ही पाकिस्तानात जावं असा टोला दिला.