अखिलेश राहुल पाटील ९२.२०% गुणाने सर्वप्रथम
सूर्यकांत जोग दीपशिखा सैनिक शाळा, चिखलदरा जि.अमरावतीचा १००% निकाल

अखिलेश राहुल पाटील ९२.२०% गुणाने सर्वप्रथम
सूर्यकांत जोग दीपशिखा सैनिक शाळा, चिखलदरा जि.अमरावतीचा १००% निकाल
नागपूर/अमरावती: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरचे अध्यक्ष,संपादक. प्रकाशक राहुल पाटील यांचे चिरंजीव अखिलेश पाटील याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत ४६१/५०० गुण घेत ९२.२०% टक्के प्राप्त करून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
अखिलेश हा सूर्यकांत जोग दीपशिखा सैनिक शाळा, चिखलदरा जि.अमरावती या सैनिक शाळेत मागील दोन वर्षापासून शिक्षण घेत होता. त्याने सैनिकी पूर्व प्रशिक्षण संस्था (एस पी आय) ने घेतलेल्या २०२५-२६ प्रवेश पूर्व परीक्षेतही बाजी मारली असून नुकतीच त्याची एस पी आय छत्रपती संभाजीगगर येथे मुलाखत झालेली आहे. एनडीए मार्फत सैन्यात अधिकारी हो देशसेवा करण्याचा मानस त्याने बोलून दाखवला. सर्व स्तरातून त्याच्या या यशाचे कौतुक होत आहे.
सूर्यकांत जोग दीपशिखा सैनिक शाळा, चिखलदरा जि.अमरावती येथील प्राचार्य मा. चार्जन सर, वर्गशिक्षक बालाजी काळे सर, सहशिक्षक पवार सर, पोरे सर, संचालक कुलकर्णी सर व ब्रिगेडीयर संग्राम दळवी सर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.





