पोर्ट ब्लेअर येथे साहित्यकार संमेलनात कवयित्री निर्मला मचाले यांच्या ‘नवांकुर’ संग्रहाचे कौतुक
मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेचाही गौरव
पोर्ट ब्लेअर येथे साहित्यकार संमेलनात कवयित्री निर्मला मचाले यांच्या ‘नवांकुर’ संग्रहाचे कौतुक
मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेचाही गौरव
निर्मला मचाले यांना स्वातंत्र्यवीर स्मृती आंतरराष्ट्रीय हिंदी गौरव सन्मान
अंदमान: पोर्ट ब्लेअर (अंदमान) येथे शनिवारी (ता.१८) झालेल्या महाराष्ट्र मंडळ अंदमान निकोबार व गोवा हिंदी अकादमी द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलनामध्ये सणसर गावच्या आदर्श शिक्षिका निर्मला मचाले यांना स्वातंत्र्यवीर स्मृती आंतरराष्ट्रीय हिंदी गौरव सन्मान -२०२४ देऊन गौरविले.
याप्रसंगी त्यांचा नागपूर मराठीचे शिलेदार समुहाने प्रकाशित केलेला ‘नवांकुर’ हा काव्यसंग्रह तेथील आंतरराष्ट्रीय संग्रहालयास सप्रेम भेट दिला. त्यांच्या काव्यसांग्रहाचे कौतुक करण्यात आले.याप्रसंगी संमेलनाचे स्वागतध्यक्ष प्रा.सुनील शे्ट,आश्लेषा पारकर,पुरस्कार समिती प्रमुख डॉ.सुनीता पाटील,संयोजक उस्मान मुलाणी,संयोजक डॉ .कैलास जाधव,गोरखनाथ पाटील आदी उपस्थित होते.



