पुण्यात विद्यार्थीगृह येथे रंगला रक्षाबंधन व श्रावणी शुक्रवार कार्यक्रम
वसुधा वैभव नाईक, पुणे.
पुण्यात विद्यार्थीगृह येथे रंगला रक्षाबंधन व श्रावणी शुक्रवार कार्यक्रम
वसुधा वैभव नाईक, पुणे.
पुणे : शहरात आज १७ ऑगस्ट २०२४ रोजी तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेतर्फे, पुणे विद्यार्थी गृह येथे खास शिशु वर्ग ते ४ थी साठी रक्षाबंधन आणि श्रावणी शुक्रवारचा कार्यक्रम खास रंगला.
याप्रसंगी वसुधा इंटरनॅशनलच्या अध्यक्ष वसुधा वैभव नाईक , वर्ल्ड क्विन बीजच्या अध्यक्ष मधुकर्णिका उर्फ सारिका सासवडे आणि कवीराज विजय सातपुते यांनी बालकांकडून बालगीतं म्हणून घेतली.मुले मस्त रमली.
आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कलावंत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी ‘बे दुणे चकली ‘ हा कार्यक्रम सादर करुन बालकांना मनमुराद हसवले.तसेच शीळवादन आणि बालांच्या हस्ताक्षरावरून गमती जमती सांगितल्या. मनसोक्त हसणाऱ्या मुलांना ‘मिठू मिठू पोपट ‘ ही प्रमाणपत्र दिली.
अध्यक्षस्थानी तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापिका अध्यक्ष आणि अभिनेत्री प्रिया प्रमोद दामले या होत्या. प्रिया दामले, डाॅ.मधुसूदन घाणेकर आणि डाॅ.विठ्ठल मुरकेवार , सारिका तसेच वसुधा ताई यांच्या शुभहस्ते खाऊ वाटप करण्यात आले. तसेच, कार्यक्रमाचे संयोजन तितिक्षा इंटरनॅशनलच्या सचिव अजिता मुळीक यांनी केले. पुणे विद्यार्थी गृह शिशुनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा कांबळे यांनी अतिथींचा सन्मान केला.सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.





