रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
अलिबाग प्रतिनिधी, तुषार थळे

रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
अलिबाग प्रतिनिधी, तुषार थळे
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
अलिबाग: पेण तालुका फोटोग्राफर असोसिएशन संलग्न रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन तर्फे रा.जि.प शाळा धरणाची वाडी, बारशेत येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे आज (दि २५) वाटप करण्यात आले.
सदर वाडीवर आम्ही मागील वर्षी दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम केला होता त्यावेळी त्या शाळेवरील शिक्षक श्री गायकवाड सर यांच्यासोबत बोलताना आम्हाला असे समजले की, वाडीवर या शाळेमध्ये अंदाजे 20 मुले असतात. परंतु त्यांच्या घरची परिस्थिती खूप चांगली नसल्याने नवीन दप्तर वह्या पेन पेन्सिल आणि इतर साहित्य दरवर्षी घेणे त्या पालकांना जमत नाही. तरी त्याचवेळी पेण तालुका असोसिएशन अध्यक्ष श्री समाधान पाटील आणि कमिटीने सरांना शब्द दिला होता की यावर्षी या शाळेतील मुलांना जे काही शैक्षणिक साहित्य लागेल ते पेण फोटोग्राफर असोशियन तर्फे देण्यात येईल.
त्याप्रमाणे आज आम्ही त्याचे वाटप केले आणि आम्ही दिलेला शब्द पाळला याचे खूप समाधान वाटले.
या कार्यक्रमात पेण फोटोग्राफर असोसिएशन सभासदांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली.