“शेतकऱ्यांनी वर्षा दोन वर्षांतून एकदा माती-पाणी परीक्षण केलेच पाहिजे”; संदीप वराले
श्री स.भु. प्रशाला बालानगर येथे 'शेतकरी मेळावा' संपन्न
“शेतकऱ्यांनी वर्षा दोन वर्षांतून एकदा माती-पाणी परीक्षण केलेच पाहिजे”; संदीप वराले
श्री स.भु. प्रशाला बालानगर येथे ‘शेतकरी मेळावा’ संपन्न
पद्माकर वाघरूळकर, ईश्वर कसबे
बालानगर दि.१६ (प्रतिनिधी)- पैठण तालुक्यातील श्री सरस्वती भुवन प्रशाला बालानगर येथील शेतकरी मेळाव्यात संदीप वराले कृषी अधिकारी पैठण यांनी वरील विधान केले.
सामाजिक दायित्व या उद्देशाने श्री सरस्वती भुवन शिक्षणसंस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रेरणेने प्रत्येक शाखेवर शेतकरी मेळावा होतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त अमोल भाले, प्रमुख मार्गदर्शक कृषी अधिकारी पैठणचे संदीप वराले, प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, शालेय समितीचे सदस्य भास्कर गोर्डे, महेश सोमाणी, दिगंबर गोर्डेतात्या या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले.
कृषी अधिकारी पैठण संदीप वराले यांनी आपल्या मार्गदर्शनात शासनाच्या शेतीविषयक वेगवेगळ्या योजना यांची सखोल माहिती देऊन शेतकऱ्यांनी किमान वर्षा दोन वर्षांतून आपल्या शेतीचे माती-पाणी परीक्षण करावे असे आवाहन केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मनमोकळ्यापणाने उत्तरे देऊन सुसंवाद साधला.
अध्यक्षीय समारोपात संस्थेचे विश्वस्त अमोल भाले यांनी शेतकऱ्यांनी स्वावलंबी बनलै पाहिजे, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. आंतरपिके घेतली पाहिजे. असे स्वानुभवाधारित मार्गदर्शन केले. अनेक शेतकऱ्यांनी या मेळाव्याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, सूत्रसंचालन पद्माकर वाघरूळकर, आभारप्रदर्शन सुधाकर येवतीकर, फलकलेखन कलाशिक्षक प्रदीप ब्राह्मणकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचक्रोशीतील शेतकरी प्रविण गोर्डे, पत्रकार सुरेश गोर्डे व प्रशालेतील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले.





