आरोग्य व शिक्षणनागपूरब्रेकिंगविदर्भ
नागपूर जि.प. मध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचे समुपदेशन सुरू
एकूण ४४ शिक्षकांना आज पदस्थापना
0
1
8
2
9
9
नागपूर जि.प. मध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचे समुपदेशन सुरू
नागपूर: जिल्हा परिषद नागपूर येथील आबासाहेब खेडेकर सभागृहात आज (दि १८ जून) रोजी १०.३० वा. प्राथमिक व पदवीधर शिक्षकांचे समुपदेशन सुरू झाले असून, एकूण ४४ शिक्षक शिक्षिकेच्या समुपदेशन प्रक्रीयेस सुरूवात झाली आहे.
या प्रक्रीयेदरम्यान सर्वप्रथम महिला शिक्षकांचे समुपदेशन होत आहे. नंतर अवघड क्षेत्रात जाणा-या शिक्षकांना त्यांच्या इच्छेनुसार रिक्त पद स्क्रीनवर दाखवण्यात येत आहे. नंतर बदली यादीनुसार इतर शिक्षकांचे समुपदेशन होणार आहे.
या समुपदेशन प्रक्रीयेत मु का अ सोबत इतर प्रशासकीय अधिकारी सर्व पं स चे बि ई ओ बीडीओ व सहकारी कर्मचारी आदी या समुपदेशन प्रक्रीयेस सहकार्य करीत आहे.
0
1
8
2
9
9