एम.बी.पटेल महाविद्यालयाच्या इतिहास विभागाची कचारगडाला शैक्षणिक भेट
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
एम.बी.पटेल महाविद्यालयाच्या इतिहास विभागाची कचारगडाला शैक्षणिक भेट
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया: मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय सालेकसा च्या इतिहास अभ्यास मंडळाद्वारे जिल्ह्यातील ऐतिहासिक आदिवासी समाजाचे धार्मिकस्थळ कचारगड येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यात इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. नामदेव हटवार, डॉ. बाबुसिंग राठोड, डॉ. वर्षा गंगणे, प्रा. योगेश्वर जोगी , ग्रंथपाल अरविंद भगत, प्रा. मनोहर वाघेरे, प्रा. मंडले यांच्या मार्गदर्शनात ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले होते.
डॉ हटवार यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी समाज, संस्कृती,पर्यटन, कचार गडाचे उत्खनन याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कचारगडाच्या सर्वच ठिकाणातील गुफा विद्यार्थ्यांनी बघितल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश पागोटे, अरुणकुमार टेकाम, समीर पंधरे, मोनिका कोरेटी, प्रिया चुल्हरकर, पुनम पंधरे,रेखा कुरेटी, समीर अंबादे, छाया पंधरे, रमेश चुटे यांनी परिश्रम घेतले.



