
0
6
5
6
0
4
ठगबाजी
जय जवान जय किसान
म्हणताच वाढायचे अवसान
ओला असो की कोरडा
होतंय कोणाचे रे नुकसान ?
शिळ्या कढीला रे तापविता
उकळी आपोआप रे फुटली
तोंडसुख रे घेत राजकारणी
मोकाट अशी कशी सुटली ?
सबका साथ सबका विकास
बोलायला वाटतंय रे झकास
ठगबाजी वाढविली कोणी ?
विकासच झालाय रे भकास
ठगबाजीचा हा गोरखधंदा
देशातंर्गत कसा फोफावला ?
दिवसाढवळ्या विकती सारे
काळ कसा रे हा सोकावला ?
नकोय आश्वासनांची खैरात
ठोस पाऊल आता उचलावे
दोर तुटलेल्या त्या नौकेवाणी
देतेय रे लोकशाही हेलकावेसंग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
======
0
6
5
6
0
4



