Breaking
अलिबागकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्ररायगड

जे. एस. एम. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रवीण गायकवाड यांची रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयकपदी नियुक्ती

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 9 4 8 7

जे. एस. एम. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रवीण गायकवाड यांची रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयकपदी नियुक्ती

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग : जे. एस. एम. महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील सहयोगी प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रवीण गायकवाड यांची रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जे. एस. एम. महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रा. डॉ. प्रवीण गायकवाड हे जे. एस. एम. महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, सन २०१९ पासून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक म्हणूनही प्रभावीपणे कार्य केले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, राष्ट्रप्रेम, श्रमप्रतिष्ठा व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

महाविद्यालयीन स्तरावर विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. रक्तदान, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, आरोग्य व व्यसनमुक्ती जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन, एच.आय.व्ही./एड्स जनजागृती तसेच विविध सामाजिक विषयांवर कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला त्यांनी चालना दिली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना ‘उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक म्हणून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे नियोजन, समन्वय व मार्गदर्शन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांना अधिक प्रभावी दिशा देणे, कार्यक्रम अधिक व्यापक करणे आणि विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याच्या माध्यमातून सक्षम नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी त्यांच्या अनुभवाचा निश्चितच लाभ होणार आहे.

या नियुक्तीबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. डॉ. गौतम पाटील, उपाध्यक्षा मा. सौ. शैलाताई प्रमोद पाटील आणि कार्यवाह मा. डॉ. साक्षी गौतम पाटील यांनी प्रा. डॉ. प्रवीण गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. प्रवीण गायकवाड यांचे अभिनंदन केले. त्यांच्या अनुभवाचा व कार्यक्षम नेतृत्वाचा रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांना निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे