0
4
8
2
9
7
खडतर वाट
चालतांना जीवनमार्ग
असे जरी खडतर वाट
रुतेल पायी काटा अशी
ही आडमार्गावरची वाट
गमक यशाचे शिखर
इथेचं सापडेल खरेखुरे
होतील जरी कष्ट पडले
आनंद त्यात सापडे बरे
करावी लागेल मेहनत
जिद्द उराशी बाळगून
खडतर वाट होई सुकर
निघता तावून सुलाखून
परिस्थितीशी दोन हात
करावं लागतं प्रसंगोपात
त्याविना धोपट मार्ग ही
होणार नाही आत्मसात
खचून जाऊ नये कधी
छोट्या मोठ्या संकटाला
मनोधैर्य वाढवून नेहमी
शिका सामना करायला
खडतर प्रवास करतांना
ज्याने जुमानले ना संकटा
विजयी झाला शेवटी तो
जरी लढला असेल एकटा
बी एस गायकवाड
पालम,परभणी
0
4
8
2
9
7



