Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजन

विद्यार्थीनींना आरोग्य विषयक, अध्यात्मिक व सोशल मिडिया यांबाबत मार्गदर्शन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 4

विद्यार्थीनींना आरोग्य विषयक, अध्यात्मिक व सोशल मिडिया यांबाबत मार्गदर्शन

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास येथे आयोजन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: बुधवार दि. ७ जानेवारी २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मधील इ. ११ वी व इ. १२ वी च्या विद्यार्थीनींना स्त्री जन्मा तुझी कहाणी या कार्यक्रमांतर्गत सकाळ सत्रात स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ. मेघा घाटे मॕडम यांनी स्त्रीयांच्या आरोग्य विषयक समस्या तसेच मानसिक व शारीरिक स्वास्थ्य याविषयांवर मार्गदर्शन केले.

प्रोफेशनल आर्टिस्ट ॲडव्होकेट वर्षा शेठ मॕडम यांनी अध्यात्म, गुरुजन व आई – वडील यांचा आदर याविषयांवर मार्गदर्शन केले. जहांगीर आर्ट्स गॕलरी सहकारी तन्वी शेट्ये मॕडम यांनी सोशल मिडिया याविषयी मार्गदर्शन केले . याप्रसंगी स्टाफ नर्स वृषाली नाईक मॕडम व ऋतुजा पाटील मॕडम उपस्थित होत्या.

तसेच बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक/ प्राचार्य अनिल दारकुंडे सर व ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन कैलास शिकारे सर यांनी तर आभार प्रदर्शन धनराज फड सर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे