Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

“विचार करून पहा म्हणजे विकास होईल”; वृंदा करमरकर

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 0

“विचार करून पहा म्हणजे विकास होईल”; वृंदा करमरकर

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

मध्यंतरी मी आमच्या नात्यातील एका लग्नाला गेले होते. खूप गर्दी झाली होती कार्यालयात. लग्नावेळी खूप अक्षदा उधळल्या गेल्या. ते तांदूळ अक्षरशः पायदळी तुडवले जात होते. वधूवरांच्या डोक्यावर किती अक्षता घातल्या प्रश्र्नच आहे. लग्न लागले आणि बाहेर वारेमाप फटाके लावले गेले. त्यांचा धूर साऱ्या हाॅलमध्ये भरला. लोकांना श्वास ही घेता येईना. नंतर जेवणाची पंगत बसली तर किती आग्रह केला जात होता! ताटात मसालेभात, जिलब्या लाडू भरभरून वाढले जात होते. लोक अन्न पानात टाकत होते.किती अन्न वाया गेलं त्याची गणतीच नाही.अनेक उपाशी लोक, गरीब लोक तिथं जेवले असते. खरोखर या सर्वांचा विचार करून पाहिला पाहिजे.अन्नाची नासाडी न करता, अती आग्रह न करता वाढता आले असते. अक्षतां ऐवजी फुलांच्या पाकळ्या वापरता आल्या असत्या. फटाके उडवणं टाळता आलं असतं.

खरोखर दैनंदिन जीवनात आपल्या हातून कळत नकळत अनेक चुका होत असतात. वाहने वेगाने चालवून अनेक अपघात होतात. वाहनांची दुरुस्ती न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साइड हवेत मिसळून वायू प्रदूषण होते. त्यामुळे धुरके, धुके यांची समस्या निर्माण होते. किमान एक दिवस प्रत्येकानं सायकल वापरलीतर प्रदूषणा ला आळा बसेल.अगदी अभयारण्य, जंगल भ्रमंतीच्या नावाखाली जंगलात कचरा करणं टाळलं पाहिजे. निसर्गाचं रक्षण केलं तर आपल्या पुढील पिढ्यांना निरोगी जीवन जगता येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, कचरा करणं टाळलं पाहिजे. अगदी गडकिल्ले, प्राचीन वास्तू बघायला गेल्यावर तिथ ल्या भिंतीवर आपल्या तथा कथित प्रेमाचं प्रदर्शन करता ना बदामाकृतीत आपली नावं लिहिणं, आक्षेपार्ह मजकूर लिहिणं, प्लास्टिक कचरा करणं टाळलं पाहिजे.

मोबाईलचा अती वापर,आभासी दुनियेत रमून नाती तोडणं,स्वार्थी वृत्ती अंगिकारणं टाळता येईल. आपल्या कुटुंबातील वृद्धांची काळजी घेतली पाहिजे.नातेसंबंध जप ले पाहिजेत.कारण माणूस हा समाजप्रिय असतो. आपण सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे. नैतिकतेच्या पोकळ गप्पा न मारता ती अंगी बाणली तर मुलांवर ही चांगले संस्कार होतील.सण साजरे करताना तरी सामाजिक भान जपले जाते का? आपल्या वागण्याचा प्रत्येकानं डोळस पणे विचार करून पाहिला तर आदर्श समाज निर्माण होईल. समाजातील उपेक्षितां चे प्रश्न सोडविण्यासाठी थोडा फार हातभार आपण लावू शकतो. प्रत्येकानं आपापलं काम चोख बजावलं तर समाजविकास साध्य होईल.

आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘विचार करून पहा’ हा विषय सर्वांना विचार करायला लावणारा आहे. शिलेदारांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

3.7/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे