Breaking
अलिबागकोकणक्रिडा व मनोरंजनरायगड

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये ग्रंथपाल नथुराम परशुराम म्हात्रे सर यांना सेवापूर्ती निरोप

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 6 4 4 2

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये ग्रंथपाल नथुराम परशुराम म्हात्रे सर यांना सेवापूर्ती निरोप

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: ( दि ३०) नथुराम परशुराम म्हात्रे सर बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये दि.१५ सप्टेंबर १९९२ पासून अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून रुजू झाले. दि. १३ एप्रिल २०२३ पासून त्यांना शासनाने बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास या शाळेबरोबरच इंडियन एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा, वरसोली व महात्मा गांधी विद्यालय, हाशिवरे या शाळांचा कार्यभार देऊन पूर्ण वेळ ग्रंथपाल म्हणून मान्यता दिली. आजवर अतिशय निष्ठेने व अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी ग्रंथपाल म्हणून कामकाज केले आहे.

एकूण ३३ वर्षे, ८ महिने, १६ दिवस इतका प्रदिर्घ काळ सेवा करून नियत वयोमानानुसार ते दि. ३१ मे २०२६ रोजी सेवा निवृत्त होत आहेत. या निमित्तानं नथुराम परशुराम म्हात्रे सरांचा शनिवार दि. ३० मे २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये निरोप व शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.

त्यानंतर नथुराम परशुराम म्हात्रे सर व त्यांच्या सौभाग्यवती पूजा नथुराम म्हात्रे यांचे शिक्षकेत्तर कर्मचारी मधुमती गायकर वहिनी व सहाय्यक शिक्षिका पल्लवी पाटील मॅडम, प्रिती कवळे मॅडम व शतदा राऊत मॅडम यांनी औक्षण केले. त्यानंतर नथुराम परशुराम म्हात्रे सरांना संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सभासद, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे यांच्यातर्फे नथुराम परशुराम म्हात्रे सर यांना भेटवस्तू देण्यात आली. तसेच उपस्थित विद्यार्थी व मित्रपरिवार यांच्या तर्फेही नथुराम परशुराम म्हात्रे सर यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे कार्यकारिणी सभासद सुहास म्हात्रे, कार्यकारिणी सभासद दिपक राऊळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक प्रमोद भगत सर, माजी सहाय्यक शिक्षक महादेव कोळी सर, माजी लिपिक अण्णा राणे सर, माजी लिपिक प्रकाश राणे सर, माजी शिक्षकेत्तर कर्मचारी अजित किणी, साधन व्यक्ती प्रशांत ठाकूर सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, बालवाडी प्रमुखा प्रमोदिनी पाठक मॅडम, प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षिका तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच नथुराम म्हात्रे सर यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून नथुराम परशुराम म्हात्रे सर यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच या कार्यक्रमाप्रसंगी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे कार्यकारिणी सभासद दिपक राऊळ, माजी मुख्याध्यापक प्रमोद भगत सर, विद्यमान मुख्याध्यापक अनिल दारकुंडे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, सहाय्यक शिक्षक धनराज फड सर, अजित नाईक सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रकाश गिरी, नथुराम परशुराम म्हात्रे सर यांचे मित्र प्रविण म्हात्रे यांनी आपली मनोगते व्यक्त केली व नथुराम परशुराम म्हात्रे सर यांना शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर नथुराम परशुराम म्हात्रे सर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेविषयी व विद्यालयाविषयी असलेल्या आपल्या भावना व ऋणानुबंध व्यक्त केले. तसेच त्यांनी संस्थेला व विद्यालयाला ब्लूटूथ स्पिकर भेट दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन, सन्मान पत्राचे वाचन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर नथुराम परशुराम म्हात्रे सर यांनी दिलेल्या अल्पोपहाराचा उपस्थित सर्वांनी आस्वाद घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 4 4 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे