0
4
8
2
9
0
मनात काही नाही…
आजकाल स्टेट्स लावत एक नाही
मनात काही नाही असे एक नाही….
उतरवतो अलगद मनातल्या बाता
माझे विधान हे केव्हाचं फेक नाही….
माय, बाप परिवार सारेच इथे माझे
कचऱ्याच्या ढगातला मी लेक नाही….
पाहतो अश्रू ढासळताना रोज परके
मनातल्या भावनांना लपवणे शक्य नाही….
सुखाचा डोंगर, दुःखाची ती खाई
सोशल मिडियावरती देखरेख नाही….
कुणाचे कौशल्य मोजले होते आम्ही
सांगतो खरे आम्हाला ती पारख नाही….
म्हणे दिसतो प्रेम रोज फसवा इथे
भुजवले काळजाचे आम्ही भोकं नाही….
पु. ना. कोटरंगे
सावली जि चंद्रपूर
0
4
8
2
9
0



