न्यु मून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
तारका रुखमोडे गोंदिया प्रतिनिधी

न्यु मून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
तारका रुखमोडे
गोंदिया प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
अर्जुनी/ मोर : फेब्रुवारी / मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज २ मे रोजी जाहीर करण्यात आला. अर्जुनी / मोर तालुक्यातील न्यु मून इंग्लिश मीडियम स्कूल तथा सायन्स ज्युनिअर कॉलेज मधील परीक्षेत प्रविष्ट सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
कॉलेजचा एकूण शेकडा निकाल १००% लागला असून वंश विनोद नाकाडे ७५.१७% गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम आलेला आहे. प्रणय मेश्राम ७१.१७% घेऊन द्वितीय आणि धनश्री शिवणकर ७०.३३ % घेऊन तिसरी ठरलेली आहे. आस्था दहिवले हिने ६९.५०% गुण मिळवत चौथा आणि मयुरी हर्षे ६८.५० % गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला आहे.विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली.
बोर्ड परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी नाविन्यपूर्ण पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेची ही तिसरी बॅच असून उत्कृष्ट निकाल लागला आहे .या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे सर्व संचालक मंडळांनी विद्यार्थी ,पालक तथा प्राचार्य,प्राध्यापक वर्ग व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शनीय परिश्रम व गुरुशिष्यातील सदृढ नाते यामुळे सर्वोत्तम यश शक्य होत असल्याचे मत शाळेचे अध्यक्ष यशवंतराव परशुरामकर,संस्थासचिव ओमप्रकाशसिंह पवार आणि संचालक संतोष बुकावन यांनी केले. मुख्याध्यापक श्री राकेश उंदीरवाडे यांनी सांगितले की, ही यशाची परंपरा ही शाळेतील शिस्त, गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची मेहनत व पालकांचे सहकार्य यांचा समन्वय आहे. तसेच पर्यवेक्षिका तारका रुखमोडे यांनी ‘ हे यश तुम्ही केलेल्या परिश्रमाचं,जिद्द, चिकाटीचं सुंदर फळ आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर असेच यश मिळवून कुटुंबाचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करा’ असे वर्तवत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांनी केलेल्या या उज्ज्वल कामगिरीने शाळेच्या शिक्षणप्रणालीवर विश्वास अधिकच दृढ झाला आहे.



