
0
4
8
3
0
0
झिजलेला देह
अखंड झिजलेला देह त्याचा
आजही तरळतो डोळ्यांसमोर
घामाच्या धारांचे आभूषण
दिसतात मला किती मनोहर…
बाप माझा कष्टाळू होता
बर्यावाईटाची होती जाण
ताठ मानेने जगला आयुष्य
हाच त्याचा मोठा सन्मान…
काळ्या आईची सेवा केली
अहोरात्र राबला उभ्या शेतात
झिजवली सारी त्यानेच काया
पुण्याई पडत होती पदरात.
सोडून गेला बाप जेव्हा
झिजलेला देह मी पाहिला
घरातल्या प्रत्येक कणात
आज स्मरणरूपी राहिला…
बाप होता आधारवड माझा
कष्टाचे त्याच्या मोल नाही
उणीव भासते त्याची आजही
सल काळजात खोल राही…
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्रर, जि.पुणे
0
4
8
3
0
0



