ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध
महाराज पुन्हा येऊ नका
वृंदा (चित्रा) करमरकर ता. जिल्हा सांगली

0
4
8
2
5
1
महाराज पुन्हा येऊ नका
अन्यायाचा, अत्याचाराचा
चहुबाजूंनी वन्हि चेतला
बळी तो कान पिळी इथे
दुबळ्यांना वाली नुरला
किती निर्भया जाती बळी
लांडग्यांची फिरते हो टोळी
कुणाची ना कसली भीती
चोर सोडून संन्याशी सुळी
रात्रंदिन राबराबून सुद्धा
शेतकरी कर्जात बुडाले
बांधांवरच्या झाडांवरती
किती फाशीचे दोर लटकले
राज्यकर्ते आता नाहीत
दूरदर्शी,धोरणी, धुरंधर
आपली तुंबडी भरण्यात
मग्न नेतेची हे बिलंदर
महाराज पुन्हा येऊ नका
राजे, खेदाने म्हणावे लागले
पाहूनी हे क्लेश होऊन प्रश्न
पडेल, यासाठी स्वराज्य निर्मिले?
वृंदा (चित्रा) करमरकर
ता. जिल्हा सांगली
0
4
8
2
5
1



