अर्जुनी/ मोर येथे ‘युथ इन ॲक्शन’च्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन
तारका रुखमोडे, प्रतिनिधी गोंदिया
अर्जुनी/ मोर येथे ‘युथ इन ॲक्शन’च्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन
“युथ इन ॲक्शन’ नवयुवकांसाठी क्रांतिकारी पाऊल”; स्वच्छता सभापती सपना उपवंशी यांचे प्रतिपादन
तारका रुखमोडे, प्रतिनिधी गोंदिया
बिनधास्त न्यूज नेटवर्क
गोंदिया/ अर्जुनी/मोर: (दि १३ मार्च) शहरातील युवकांमध्ये नेतृत्व, कर्तृत्व, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने अर्जुनी/ मोर येथे कार्यरत असलेल्या ‘युथ इन ॲक्शन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने आज (दि १२) प्रभाग क्र. १० येथे शैक्षणिक मार्गदर्शन व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात व मोठ्या थाटात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर पंचायत, नगरसेविका तथा आरोग्य स्वच्छता सभापती सपना उपवंशी या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, ज्येष्ठ मार्गदर्शक घनश्याम चांदेवार, सामाजिक कार्यकर्ते सागर उपवंशी, ‘युथ इन ॲक्शनचे अध्यक्ष डाॅ. कुणाल चांदेवार, मुख्य सल्लागार अश्विनसिंह गौतम, तसेच सचिव (सरचिटणीस) नयन रुखमोडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाध्यक्षा सपना उपवंशी यांनी ‘युथ इन ॲक्शन’ च्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत, या संस्थेमुळे समाजाला दिशा देणारे आदर्श आणि क्रांतिकारी युवक तयार होतील, असा विश्वास व्यक्त केला. ज्येष्ठ मार्गदर्शक घनश्याम चांदेवार यांनी युवकांना सकारात्मक विचार आणि संयमाच्या बळावर संकटांचा सामना करण्याचे आवाहन केले. लोकपाल गहाने यांनी व्यसनमुक्त जीवन, स्वावलंबन आणि कुटुंबीय जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत समाजकार्यात योगदान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्य सल्लागार अश्विनसिंह गौतम यांनी संघटनेच्या वैचारिक भूमिकेवर प्रकाश टाकत युवकांनी समाजहितासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डाॅ.कुणाल चांदेवार यांनी केले.
कार्यक्रमाचे ओघवत्या भाषेत प्रभावी सूत्रसंचालन युथ इन ॲक्शनचे उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधांशू मेहता यांनी केले. सचिव नयन रुखमोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामाजहिताच्या जाणिवेतून निर्माण झालेल्या या जनसंपर्क कार्यालयाचे कामकाज अतिशय जबाबदारीने पदस्थांच्याद्वारे कार्यान्वित केले जाणार आहे. यात सहभागी पदाधिकाऱ्यांच्या जनजाणिवेतून गरजू युवकांच्या समस्यांचे निराकरण व गरजूंना मदत याद्वारे केली जाणार आहे. युवकांसाठी हा नक्कीच मैलाचा दगड ठरणार आहे. ज्या होतकरू युवक युवतींना शैक्षणिक समस्या वा तत्सम समस्या असतील तर त्यांनी या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सचिव नयन रुखमोडे, डाॅ. कुणाल चांदेवार, पत्रकार तथा सल्लागार अश्विनसिंह गौतम यांनी केली आहे.



