Breaking
नागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसंपादकीयसांगलीसाहित्यगंध

“निसर्गाचा संकेत लक्षात घेण्याची गरज”; वृंदा करमरकर

सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण

0 6 2 9 0 4

“निसर्गाचा संकेत लक्षात घेण्याची गरज”; वृंदा करमरकर

सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे परीक्षण

निसर्ग म्हणजे जीवनाचा आधार, सृष्टीचा श्वास आणि मानवाचा खरा सोबती.हिरवीगार वनराई, खळखळणाऱ्या नद्या, उंच पर्वत आणि अथांग समुद्र, निळेआकाश, सावळे मेघ यांमुळे पृथ्वी सुंदर दिसते.पण याच निसर्गाचे रौद्ररूप समोर आले की माणसाची सारी शक्ती क्षणात क्षीण होते.पूर, वादळे,भूकंप,भूस्खलने,ढगफुटी आणि दुष्काळ ही त्याच्या रौद्रतेची रूपे आहेत.निसर्ग कोपला की त्याची भाषा वेगळी असते.अलीकडच्या काळात जगभरात अशा नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढताना दिसते.

नेपाळमध्ये आलेला भीषण पूर निसर्गाच्या कोपाची जाणीव करून देणारा आहे.अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्याने अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले.रस्ते, पूल, घरे आणि पायाभूत सुविधा पाण्या च्या प्रवाहात वाहून गेल्या. डोंगराळ प्रदेशात दरडी कोसळल्याने वाहतूक आणि संपर्क व्यवस्था ठप्प झाली. अनेक माणसे वाहून गेली, बेपत्ता झाली .क्षणभरात सुरक्षित वाटणारे जीवन अनिश्चित तेच्या गर्तेत लोटले गेले.

भारतामध्येही मान्सूनच्या काळात अनेक राज्यांना पुराचा तडाखा बसतो. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाबरोबरच भूस्खलनाच्या घटना घडतात. डोंगर अक्षरशः खचतात आणि रस्त्यांवर माती-दगडांचे ढिगारे साचतात.नद्यांना आलेल्या महापुरामुळे गावागावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. कधी ढगफुटी होते, तर कधी काही तासांतच महिन्याएवढा पाऊस कोसळतो. मुंबईसारख्या महानगरांमध्येही अति वृष्टीमुळे पाणी साचते. वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते आणि जनजीवन ठप्प होते. शहरांच्या काँक्रीटच्या जंगलात पावसाचे पाणी वाट शोधू शकत नाही.नद्या, नाले आणि नैसर्गिक जलमार्गांवर झालेली अतिक्रमणे परिस्थिती अधिक गंभीर करतात.डोंगर कापून उभारलेल्या वस्त्यांनाही भूस्खलनाचा धोका वाढतो.

निसर्गाच्या या बदलत्या रूपामागे मानवी हस्तक्षेपाचाही मोठा वाटा आहे. अमर्याद वृक्षतोड, जंगलांचा ऱ्हास आणि डोंगरांचे बेसुमार उत्खनन सुरू आहे.नद्यांच्या पात्रात कचरा टाकून नद्या प्रदूषित करण्याबरोबर आपण त्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवतो.प्लास्टिक आणि प्रदूषणामुळे जलस्रोतांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाढते शहरीकरण आणि अनियंत्रित बांधकामामुळे जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता कमी होतआहे. वातावरणातील वाढते तापमान हीदेखील चिंतेची बाब आहे. उन्हाळ्यात भारतातील अनेक शहरांचे तापमान ४५ ते ५० अंश सेल्सिअसच्या पार जात आहे. ही केवळ उष्णता नसून निसर्गाने दिलेला इशारा आहे

आज नेपाळमधील पूर आपल्याला सावध करतो आहे. हिमाचल मधील भूस्खलने आपल्याला विचार करायला भाग पाडतात. महानगरांतील पावसाचे पाणी आपल्याला नियोजनाची गरज सांगते.या प्रत्येक घटनेत निसर्गाचा एक मौन संदेश दडलेला आहे. “माझ्याशी संघर्ष करू नका, माझे संतुलन जपा.” निसर्गाचे रक्षण करणे म्हणजे केवळ झाडांचे रक्षण करणे नव्हे. ते भावी पिढीच्या भविष्याचे रक्षण आहे.आज आपण पृथ्वीला काय देतो, यावर उद्याचे जग अवलंबून आहे.निसर्गाचा कोप टाळायचा असेल तर मानवी लोभाला लगाम घालावा लागेल.

विकास हवा, पण तो पर्यावरणा च्या किंमतीवर नको.निसर्ग आपला जीवनदाता आहे. त्याच्या कुशीतच मानव जातीचे अस्तित्व सुरक्षित आहे.त्याच्या नियमांचा आदर केला तर तो आपल्याला भरभरून देतो. पण त्याचा अवमान केला तर त्याचे रौद्ररूप आपल्याला धडा शिकवते. म्हणून निसर्ग कोपण्याची वाट पाहू नका; आजपासूनच त्याची काळजी घ्या. निसर्ग वाचला, तरच मानव वाचेल आणि मानव वाचला तरच भविष्य उजळेल. आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी ‘कोपता निसर्ग’ हा वैचारिक विषय दिला आहे. नवनवीन विषय देणे हा सरांचा हातखंडा आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक. शिलेदारांनी पण स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन!आदरणीय सरांनी मला परिक्षण लिखाणाची संधी दिल्या बद्दल त्यांचे मनापासून आभार.

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे