
♾️♾️♾️♾️🙏🍃🙏♾️♾️♾️♾️
*🙏”आभारीय मनोगत*“🙏
♾️♾️♾️♾️🙏🍃🙏♾️♾️♾️♾️
*माझ्या ‘विचार करूया जरा’ या कवितेला सर्वोत्कृष्ट काव्यरचनेत स्थान दिलं. त्यासाठी सर्व मराठीचे शिलेदार समूहाचे विशेष आभार. तिसऱ्यांदा हा सन्मान मिळाला त्यासाठी आदरणीय राहुल दादा, सविता ताई, सर्व परीक्षक, पदाधिकारी आणी सदस्य यांचे अंतकरणातून धन्यवाद.*
*📗दादा आपण दिलेला विषय वाचून मन खूप विचार करायला लागलं. निसर्गातील अशा गोष्टीचा शोध घ्यायला लागलं, की ज्या नेहमी विचार करायला लावतात. सृष्टीचं निरीक्षण करताना अनेक प्रश्न पडतात ज्यांच उत्तरच मिळत नाही. त्यातूनच या कवितेचा जन्म झाला. दादा खरच सांगतो. कवितेचे विषयच आपल्याला सुचतात कसे तेच कळत नाही. ती पण बाब आहे जी विचार करायला लावते. विषय दिसला रे दिसला की, मन शब्दांची जमवाजमवी करायला लागते आणि त्यातूनच एखादी रचना उत्कृष्ट ठरते असो.*
*〽️दादा थोडया व्यस्ततेमुळे निरोप थोडा उशिराने पाहण्यात आला. फोटोसाठीचा निरोप हा माझ्यासाठी आनंद पर्वणीच होता. माझ क्षेत्र तसं विज्ञांनाचं मला कवितेचा गंधही नव्हता. राहुलदादां तुम्ही हात दिला आणि आज कविवर्य म्हणून सन्मान. दादा सुप्त गुणांना चालना कशी द्यावी हे तुमच्या कडून शिकावं. कधी कापसासारखे मऊ तर कधी हिऱ्या सारखे कठीण. तुमच्यात असलेली कला आणि कविता लिहण्यासाठी सर्व शिलेदाराच प्रोत्साहन कौतुकास्पद आहे. दादा सायंकाळी ९.०० वाजता येणारा विषय तो पाहून कविता लिहल्याशिवाय झोपच येत नाही. या समूहात श्रेष्ठ अन जेष्ठ अनुभवी कवी आहेत. त्यांचे अभिनंदनाचे शब्द वाचताच उर आनंदाने भरून येतो. सर्वांचे हृदयातून आभार…धन्यवाद.*
♾️♾️♾️♾️🙏🍃🙏♾️♾️♾️♾️
*कविवर्य डॉ. बालाजी राजुरकर*
*ता.हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏🍃🙏♾️♾️♾️♾️





