
0
5
7
4
4
8
लढाई संपली नाही
विद्यार्थी काय करू शकतात
आज पाहिले आहे सरकारने,
ज्यांना झुरळ समजले होतात
जंतर मंतर हादरले की त्यांने…
लढाई संपली नाही अजूनही
केंद्र सरकार घ्यावे जरा ध्यानी,
रोष ओढवून घेतलाय अंगावर
मान्य करावी लागली मागणी…
न्याय,हक्क,अधिकाराचा लढा
विद्यार्थी आंदोलन सुरु केलेले,
नीट पेपर फुटीचे प्रकरण आहे
विद्यार्थ्यांच्या जिवाशी बेतलेले…
आंदोलन कर्त्यावर लाठीचार्ज
केला अमानुष अत्याचार आहे,
बलिदान सार्थकी लागले त्यांचे
हाच आंदोलनाचा विजय आहे…
लढाई संपली नाही अजूनही
अजून खूप काही बाकी आहे ,
घाम फोडेल सरकारला एवढी
ताकद विद्यार्थी एकजुट आहे…
बी एस गायकवाड
पालम, जि.परभणी
0
5
7
4
4
8



