
0
5
7
4
4
8
समजू नका अबला आम्हा
समजू नका अबला आम्हा
आम्ही दुर्गा -सरस्वती
अन्यायाचा प्रतिकार करण्या
खड्ग घेऊ हाती
आम्ही इंदिरा,आम्ही प्रतिभा
आम्ही राणी लक्ष्मी
अबला म्हणता, आम्हामध्ये
सांगा कश्याची कमी ?
किरण, कल्पना ,सुनीता
अन् डॉक्टर आनंदी
प्रखर अपुल्या कर्तृत्वाने
नाव मिळवले जगी
राजमाता मादाम कामा
अन् मदर तेरेसा
तेजस्वी या ज्योती अमुच्या
जगी उमटवी ठसा
सावित्रीच्या मुली आम्ही
मानणार नाही हार
अन्यायाचा सदैव आम्ही
करू प्रतिकार
भुमेश्वरी सातपुते -खोंडे
ता.उमरेड जि.नागपूर
==========
0
5
7
4
4
8



