0
4
8
2
9
3
सत्वपरीक्षा
का कुणास ठाऊक गडे
का होते माझीच उपेक्षा
घेते नियती अशी घडोघडी
सदोदित ही सत्वपरीक्षा
स्वार्थाचे कलीयुग येथले
दुटप्पीपणाचाच बोलबाला
ओठी एक नि उदरी निराळे
असत्याचा जणू बाजार भरला
आणाभाकांच्या दुनियेत या
शब्दांना नाही मान राहिला
नात्यागोत्यांची करुन होळी
वचनांना तर हरताळ फासला
एवढ्यावरच न भागले येथे
मृदू भाषेचीही होई समीक्षा
नाकासमोर चालणाऱ्यांचीही
घेतली जाते सत्वपरीक्षा
बघा कितीही मज अजमावून
शपथ मी थकणार नाही
स्वाभिमानी हा ताठ कणा
लाचारीने झुकणार नाही
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
4
8
2
9
3



