Breaking
ई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनचारोळीसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 8 2 9 4

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट तेरा🎗🎗🎗*

*🌤️विषय : जगायचंय इथेच🌤️*
*🔹गुरूवार : २४ / ०४ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*जगायचयं इथेच*

जरी मला होईल कष्ट अपार
बळीराजा करीता घेईल त्रास
या मातीत जगायचयं इथेच
आहे सर्वाना कामधेनू आस

*सौ.कुसुमलता दिलीप वाकडे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
*जगायचंय इथेच*

काळी आई जपताना
जगायचंय इथेच आता
ऋण फेडायचे आहेत
गुण सृष्टीचे गाता गाता

*सचिन पाटील*
*(अलिबाग, रायगड)*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
*जगायचंय इथेच*

शेतकरी बाप माझा
राबतो दिन रात सकाळ
जगायचंय इथेच…!!
सुकाळ असो की दुष्काळ

*सौ.शशी मदनकर,ब्रम्हपुरी*
*जिल्हा_चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
*जगायचंय इथेच…!*

महादेवाचा नंदी मी बळीराजाचा सेवक
जगायचंय इथेच मला ऋण त्याचे फेडीत
कितीही कष्ट होऊ दे साहिन मी आनंदात
धन्याला माझ्या ठेवीन मी कायम सुखात

*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि.अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे. राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेची नोंदणी दि ३०/०४/२०२५ पर्यंत करावी*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*जगायचंय इथेच*

*आपल्या धन्याबरोबर शेतात*
*राबायचंय इथेच*॥
*सर्वतोपरी धन्यास साथ देवून*
*जगायचंय इथेच*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
*जगायचं इथेच*

सुखात हुरळून जायचे नाही
दुःखात कण्हत बसायचे नाही
सुख दुःखात आनंद शोधाव
जगायचं इथेच ना मागे राहाव

*साजेश मगरे ताडकळसकर*
*ता पूर्णा जिल्हा परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
*जगायंचय इथेच*

जगायचंय इथेच,
मरायचंयही इथेच,
राबायचंही इथेच,
सगळं ठेवून जायचंही इथेच//

*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
*जगायचंय इथेच*

हिरव्यागार रानासाठी
कणकण झिजवायचं इथेच
ऊन वारा पाऊस पेलत
मातीसवे जगायचंय इथेच

*कु.संगिता रामटेके/ भोवते*
*साकोली, भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
*जगायचं इथेच*

रूसली जरी धरणीमाय
उपाशी कधी मारत नाही
जगायचं तर इथेच आहे
आईची माया सरत नाही

*सविता धमगाये नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
*जगायचं इथेच*

सुखी माझा धनी
केले छोटे मोठेच
दिला खांदा शेती
जगायच इथंच …

*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
*जगायचंय इथेच*

जगायचंय इथेच
मरायचंय इथेच
ऋण मालकाचे
फेडायचंय इथेच

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
*जगायचंय इथेच*

तुझ्या माझ्या कष्टाने
वावर आपण फुलवला
जगायचंय इथेच नशिबी लिहीले
बळीराजा अंतर देऊ नको मला

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
*जगायंचय इथेच*

घाम गाळून मेहनत करतो
ऊन्हा तान्हात राबतो
माझ्या शेतकरी मालकासोबत
जगायंचय इथेच त्याच्यात राहतो

*सौ पुष्पा डोनीवार चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪷📕🪷➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे