
आठवणींच्या पाऊलखुणा
पितृपक्ष आला की, आठवणींची चाहूल लागते,
गेल्या माणसांची माया पुन्हा मनाला भेटते…
ज्यांनी हात धरून चालायला शिकवलं,
ज्यांनी जगण्याचं खरं शहाणपण शिकवलं..
आज ते सोबत नाहीत, तरी
त्यांचे संस्कार मनात कायम जिवंत राहतात…
तर्पणाच्या त्या थेंबातून,
कृतज्ञतेची भावना वाहते..
पिंडदानाच्या प्रत्येक कणातून,
पूर्वजांची आठवण जागी होते…
घराच्या उंबरठ्यावर त्यांची पाऊले नसली,
तरी त्यांच्या आठवणींची ऊब कमी होत नाही..
काळ पुढे जातो,पिढ्या बदलतात,
पण पूर्वजांची सावली कधी दूर जात नाही…
आज जे काही आहोत आपण,
त्यांच्या त्यागाचा तो वारसा आहे..
त्यांच्या आशीर्वादानेच
आपल्या आयुष्याला अर्थ आहे…
पितृपक्ष म्हणजे केवळ विधी नाही,
तो आपल्या मुळांशी जोडणारा धागा आहे..
पूर्वजांना आठवण्याचा,
आणि त्यांच्या संस्कारांना जपण्याचा
हा एक सुंदर बहाणा आहे…
हा एक सुंदर बहाणा आहे…
सिमादेवी निंबाजी बेडसे
ग्रामपंचायत अधिकारी चाळीसगाव
=========



