0
4
8
2
9
3
तारतम्य
तारतम्य ठेवावे
सदा बोलण्या चालण्यात
सभ्यतेची संस्कृती
दिसावी अपुल्या वर्तनात
स्थळ,काळ, वेळ पाहुन
वागावे अदबीने
मध्येच कुणाच्या बोलणे
टाळावे प्रकर्षाने
आदर करावा मोठ्यांचा
द्यावा त्यांना सन्मान
नको कुठली कुरापत
ज्यामुळे दुखेल स्वाभिमान
बाहेर असो वा घरात
करावे नियम पालन
उगीच कुणाच्या नको
भावनेचे निर्दालन
हर्ष,दुःख,आक्रोश
भावनात्मक कृती
प्रसंगाला साजेल
अशी असावी निती
खर्च,बचत बाबत
सदा असावे नियोजन
कामी येते जमापूंजी
करावे तिचे जतन
होणार नाही हसे
अशी असावी वागणुक
तारतम्य ठेवूनच दाखवावी
स्वभावाची चुणुक
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
8
2
9
3



