Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजनखानदेशदेश-विदेशनाशिकपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

“आभार वंदनेतून व्हावे व्यक्त; समूहाचे दान समूहातच करावे रिक्त”; संध्या पाटील

सौ.संध्या मनोज पाटील भरूच, अंकलेश्वर (गुजरात)

0 5 2 4 6 1

“आभार वंदनेतून व्हावे व्यक्त; समूहाचे दान समूहातच करावे रिक्त”; संध्या पाटील

एक जादुई संदेश दादांचा येतो, ‘तुमचा फोटो पाठवा’ लेखणीसोबत फोटो ही धन्य होतो. लेखणी दिमाखात झळकते पोस्टरवर फोटोही चार चांद लावतो. स्टेटसला शुभेच्छांचा वर्षाव होतो.

काव्यवेणी त्रिवेणी सर्वोत्कृष्टचे पोस्टर समूहात आले. लेखणीचे सार्थक झाले. दोन दिवस आधीच हायकू काव्यानेही, सतरा शब्दातील आत्म्यास धन्य केले. किती मानावे आभार कळेना झाले. व्यक्त होण्यास शब्दही याक्षणी मिळेना झाले.

“नजरेआड” हा त्रिवेणी काव्याचा विषय होता आणि सध्या सोशल मीडियावर खरात प्रकरण गाजतेय त्यावरूनच हे त्रिवेणी काव्य सुचले. खरे तर अशा घटना बऱ्याचदा घडून आल्या आहेत. कितीतरी भोंदूबाबा जनतेच्या भावनांशी खेळून आपल्या तिजोऱ्या भरून घेतात. शिवाय यात त्यांच्या तंत्र ,मंत्र विधींना महिला जास्त प्रमाणात बळी पडतात. तसे पाहिले तर हा खूप गहन विषय आहे. असे म्हणतात की “पानी पीओ छानकर,गुरु करो जानकर..आपला भारत देश साधू संतांची भूमी म्हणून ओळखला जातो.

इथे ऐतिहासिक काळापासून गुरु शिष्य परंपरा सुरू आहे, छ.शिवाजी महाराजांचे गुरु होते रामदास स्वामी. अशी बरीच उदाहरणे आहेत. गुरु म्हणजे कोणी ज्योतिषी नाही जो कुंडली बघून आपलं भविष्य सांगेल,गुरु म्हणजे असा कोणी व्यक्ती नाही जो आपल्या समस्या सोडविण्यासाठी काहीतरी तांत्रिक क्रिया करेल किंवा आपल्याच शरीराशी खेळेल..एखाद्या जीवाचाच बळी घेईल…गुरु तो जो आपल्याला आत्मिक स्तरावर जगायला शिकवून आपल्या समस्या सोडविण्यासाठी आत्मनिर्भर बनवतो.

भूत,भविष्यात न जगता वर्तमानात राहायला शिकवतो कारण भूतकाळातल्या घटना आठवून आपण दुःखी होतो आणि भविष्याच्या चिंतेतही दुःखीच होत असतो म्हणून गुरु हेच आत्मज्ञान करवतो..आपल्याच अंतर्मातून चांगल्या,वाईटाची जाणीव होईल इतक सक्षम बनवतो..नाशवान पासून शाश्वत पर्यंतची आत्मजागृती करतो..खरे सुख भौतिक जगात नसून आत्मसंगतीत आहे.. समाजात ,परिवारात राहून कमळाच्या फुलाप्रमाणे अलिप्त असे आपले अस्तित्व जोपासायला शिकवतो. जन्म,मरणाच्या फेऱ्यातून कसे वाचले पाहिजे याचा आत्मबोध करवतो..ज्याच्या सानिध्यात फक्त आत्मानंद मिळतो..कारण अशा गुरूंची आभा वातावरणात चैतन्याच्या माध्यमाने पसरलेली असते ,तिथे आपण फक्त शून्य होऊन जातो.

ना कोणती समस्या आठवत,ना कोणते दुःख आठवत…असे गुरु भेटणे,त्यांना ओळखणे सध्याच्या या आभासी जगात खूप कठीण झाले आहे…तरीही आपली बुद्धी भ्रष्ट होईल इथपर्यंत जर कोणी आपला फायदा घेतय तर ते बदनामीला घाबरून सहन करणे चुकीचे आहे.धाक दाखवून,धमक्या देऊन अत्याचार करीत गुरुं शब्दाचा अपमान करणारा,गुरूंच्या प्रतिमेला काळीमा फासणारा कसा गुरु असू शकतो एवढे तर समजलेच पाहिजे…त्यांच्या ह्या काळ्या कारनाम्यांमधे भर घालायला मोठ्या मोठ्या हस्ती असतातच…..परंतु अशा खोट्या लोकांचा पापाचा घडा एकदिवस भरतोच… असो…एवढेच सांगायचे आहे की अशा भोंदू बाबांमुळे जे खऱ्या अर्थाने समाजात जनजागृती,आत्मजागृती करीत आहेत..अशा गुरूंच्याही प्रतिमेवर लोक शंका निर्माण करतात.

असो…विषय जरा लांबला…माझे विचार मांडताना काही चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करून टाका. अशा प्रकारे समाजात चालू घडणाऱ्या घटनावर आदरणीय राहुल सर विषय देत असतात..त्याच माध्यमाने मी त्रिवेणी काव्य साकारले. आदरणीय परीक्षकांना ते भावले ..त्यासाठी मी समूहाचे सर्वेसर्वा, मुख्य संपादक, आयोजक..आ.राहुल पाटील सर, आ.सचिव.पल्लवीताई,
मुख्य परीक्षक आ.सविताताई, आ.स्वातीताई, आ.वृंदा ताईसो, आ.शर्मिला ताई,आ.तारका ताई,आ.प्रतिमा ताई,आ.विष्णू दादासाहेब,आ.ठाकरे सर,आ.संग्राम दादा, आ.उरकुडे दादा, आ.अशोक दादा आणि समस्त प्रशासक, सहप्रक्षक मंडळ..आपले सर्वांचे खूप खूप आभार..मनःपूर्वक खूप धन्यवाद. समूहातील सर्व आ.ताई, दादांचेही मनःपूर्वक धन्यवाद

सौ.संध्या मनोज पाटील
भरूच, अंकलेश्वर (गुजरात)
सदस्या मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 6 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे