आगरी समाज संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते भव्य लोकार्पण
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

आगरी समाज संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते भव्य लोकार्पण
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग : (ता १३ मे) आगरी समाज संस्था, अलिबाग (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य) यांच्या “www.agrisamajsanstha.com” या वेबसाईटचे लोकार्पण मा. आमदार महेंद्र दळवी यांच्या शुभहस्ते, त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले. या सोहळ्यास विविध मान्यवर, समाजबांधव, महिला कार्यकर्त्या, युवक आणि संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी आगरी समाज संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचे विशेष कौतुक करत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा हा उपक्रम काळाची गरज असून, डिजिटल माध्यमातून समाज संघटित करण्याचे कार्य अत्यंत स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच त्यांनी वाडगाव येथे आगरी समाज संस्थेच्या माध्यमातून भव्य “आगरी समाज भवन” उभारण्याची अधिकृत घोषणा केली. ही घोषणा संपूर्ण आगरी समाजासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असून, समाजाच्या एकतेसाठी व प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. त्यांच्या या घोषणेनंतर संपूर्ण आगरी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अविस्मरणीय क्षणासाठी मा. आमदार महेंद्र दळवी साहेबांचे आगरी समाज संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेला हा मोलाचा पाठिंबा सदैव प्रेरणादायी राहील. आजच्या डिजिटल युगात समाज एकत्र ठेवणे, नवीन पिढीपर्यंत समाजकार्य पोहोचवणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून देणे तसेच विविध उपक्रमांची माहिती समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे या उद्देशाने आगरी समाज संस्थेने ही वेबसाईट विकसित केली आहे.
समाज विकासाच्या कार्याला गती देणारे आणि समाजाला एका डिजिटल व्यासपीठावर जोडणारे हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
संस्थेची वेबसाईट अत्यंत आकर्षक, आधुनिक आणि वापरण्यास सुलभ पद्धतीने तयार केल्याबद्दल यांचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले. याआधीही त्यांनी आगरी समाज संस्थेच्या वधूवर केंद्रासाठी “vivahamilan.com” ही वेबसाईट तयार करून समाजासाठी डिजिटल क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
ही वेबसाईट साकार करणारे तरुण इंजिनिअर आणि यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. स्थानिक पातळीवरील होतकरू तरुणांनी आपल्या कौशल्य, कल्पकता आणि समर्पणाच्या जोरावर समाजासाठी उभारलेले हे डिजिटल व्यासपीठ संपूर्ण आगरी समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वेबसाईटच्या लोकार्पणानंतर उपस्थित मान्यवर आणि समाजबांधवांनी वेबसाईटचे विशेष कौतुक करत हा उपक्रम समाजाच्या एकजुटीला, प्रगतीला आणि भावी पिढीच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.



