
0
6
6
7
2
0
मायेची छाया
रक्ताचे माझे ,ते रक्त होते!
देव न पुजता ,भक्त होते !!
असेना प्राणीमात्र वेगळे !
जडता जीव, विरक्त होते !!
आई वडील ,जे भुलणारे !
लेकरे सारी ,विभक्त होते !!
हजारो लोक सोबती जरी!
पाचच अंती ,ते फक्त होते !!
विचार माझे ,सांगतो सदा !
त्यात दोन चार व्यक्त होते!!
लबाड सत्य ,मांडती कसे !
सत्य माझेही ,रे युक्त होते!!
कर्माची फळे ,भोगती येथे !
म्हणूनी रोगी ,अशक्त होते !!
मायेची छाया डोही असता!
संसारी सारे , संयुक्त होते!!
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ
0
6
6
7
2
0



