
0
5
9
0
3
4
तेजस्विता
अन्यायाला न घाबरता
टाक पुढे पाऊल
तेजस्विता तू
लागेल नव्या पहाटेची चाहूल
जरी घोंघावतील भोवताली
वादळे अत्याचाराची
कर धैर्याने वार
उगवेल पहाट नव्या युगाची
झाशीची राणी तू
तळपू दे तुझी तलवार
अन्यायाचा प्रतिकार करण्या
कर अत्याचारावर वार
विश्वासाने स्वतःच्या
उजळू दे आयुष्याची वाट
प्रयत्नांचे पंख लेवून
मिळव यशाचा थाट
डोळ्यातल्या आसवांना
स्वप्नांची साथ दे
संकटाच्या पहाडांना
धैर्याने मात दे
डॉ. सौ. मंजूषा साखरकर
ता. ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
0
5
9
0
3
4



