0
4
0
9
0
3
शापित मन
दु:खितांच्या जानून व्यथा
द्यावे त्यांना सुखाधार
आधिच असतो शापित मन
करू नये त्यांना निराधार
शापित मन हा दैवयोग
नसतो जीवनात भोग
ही कल्पकता असतो जीवनात
ठरवावे आधीच मनात
जिद्द चिकाटीने जगून जीवन
आत्मबल वाढवा स्वत:चे
निरधार करा जगण्याचा
कष्टाने बल वाढवा मनाचे
न घाबरता न सोचता
विचारणीय ठेवा मन
प्रत्येक मार्गाचा करून विचार
त्या परिने जगावे जिवन
मनालाच देऊ नका दोष
थोडा ठेवा विवेकी होष
कां असं घडत असतो स्वत:शी
होऊ नका उगीच मदहोश
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
0
4
0
9
0
3





