0
4
8
3
0
0
बोलण्यासारखे उरले नाही
बोलण्यासारखे उरले नाही
तुझ्या माझ्या नात्यात
संपला खेळ सारा इथेच
बाकी काहीच ना हातात
झाले गैरसमज कितीदा
कारण काहीच नसताना
आठवून बघ ते दिवस
तू माझ्यासोबत असताना
घेतल्या किती आणाभाका
वचनांची तर गणती नाही
बघ जरा मागे वळून
आठवते का तुला काही
आयुष्यभर साथ देण्याची
शपथ तर तुझीच होती
जीव वेडावला माझाही
झालो वेदनांचा सांगाती
तुझी सोबत असताना
सांगायचे होते बरेच काही
सोडलीस साथ आता
बोलण्यासारखे उरले नाही
श्री.पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
3
0
0



