0
4
8
2
9
3
पंख देऊ कर्तुत्वाला
गवसणी घालण्या गगनाला
देऊ कर्तुत्वाला पंख
अडसर आणण्या प्रगतीला
मारू नका कुणी डंख
ध्येय पुर्ती करण्यासाठी
मारा जबर गरुड भरारी
जाण्यास क्षितिजापल्याड
ठेवा मनही करारी
समृद्धीची भरुनी ओंजळ
आणू लकाकी आयुष्याला
दैदिप्यमान यश मिळविण्या
चला पंख देऊ कर्तुत्वाला
प्रा. दिनकर झाडे
गडचांदूर, जि चंद्रपूर
=========
0
4
8
2
9
3



