Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगोंदियाविदर्भ

न्यु मून ज्युनियर काॅलेजची तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्तुंग भरारी

तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

न्यु मून ज्युनियर काॅलेजची तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्तुंग भरारी

जिल्हास्तरावर न्यु मून काॅलेजच्या विद्यार्थ्यांची निवड

तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी

अर्जुनी / मोरगाव : तालुका क्रीडाधिकारी कार्यालय अर्जुनी /मोर यांच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूलच्या भव्य पटांगणावर 19 वर्षे खालील वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत न्यु मून ज्यु. कॉलेज येथील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी इतर काॅलेजच्या अनेक संघांचा पराभव करत प्रथम क्रमांकाची विजयी बाजी मारली. या स्पर्धेत पियुष जांभुळकर ,प्रतीक आंबेडारे, आर्यन साखरे, पुष्कर शहारे, हिमांशु जनबंधू ,देवकुमार ढाली, प्रिन्स बांडे ,अनिकेत कोहरे, तन्मय नाकाडे ,ध्रुव सिरसाम, प्रणय जांभुळकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक राकेश उंदीरवाडे,पर्यवेक्षिका सौ. तारका रुखमोडे, क्रीडा शिक्षक चंद्रशेखर लांडगे ,हिना लांजेवार यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल प्रा.राकेश उंदिरवाडे,प्रा.तारका रुखमोडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवांकित केले. संस्थाध्यक्ष यशवंत परशुरामकर व संस्थासचिव ओमप्रकाशसिंह पवार, तथा संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या.

न्यु मून काॅलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता नेहमीच विशेष लक्ष दिले जाते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे