व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलचे बोर्ड परीक्षेत सुयश
अमृता खाकुर्डीकर, प्रतीनिधी
व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलचे बोर्ड परीक्षेत सुयश
अमृता खाकुर्डीकर, प्रतीनिधी
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये 31 वर्षांची परंपरा कायम राखत व्हिजन इंग्लीश मीडियम स्कूल, वडगाव शेरी या शाळेचा निकाल १००% लागला आहे.
एकूण ३९ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्या पैकी कु.तानिया सिंग आणि कु.श्रावणी मास्तोळी या दोन विद्यार्थिनी ९१.२०% गुणांसहित प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळेतील एकूण २२ विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये शाळेचे आधारस्तंभ श्री.प्रदीप नाईक सर, सौ. माधवी गोडबोले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ममता अग्रवाल , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. रेश्मा कारळे या सर्वांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.
शाळेतील विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी विशेष तयारी करून घेतली होती. या सर्वांच्या प्रयत्नांचे फळ म्हणूनच विद्यार्थ्यांना यश मिळाले. विद्यार्थ्यांचे सर्वांनी अभिनंदन केले असून पालकांनी शाळेचे आभार मानले आहेत.



