Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ

सागवान ते रायपूर रस्त्याची अक्षरश: चाळणी; तत्काळ दुरुस्तीची मागणी

अक्षय सातव, प्रतिनिधी बुलढाणा

0 5 7 5 7 6

सागवान ते रायपूर रस्त्याची अक्षरश: चाळणी; तत्काळ दुरुस्तीची मागणी

नागरिकांसह विद्यार्थ्यी त्रस्त; प्रशासनाचे दुर्लक्ष

अक्षय सातव, प्रतिनिधी बुलढाणा

बिनधास्त न्यूज मिडीया

बुलढाणा, (दि ३० जुलै) : जिल्ह्यातील सागवान ते रायपूर मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून अक्षरश: चाळणी झाल्याचे चित्र आहे. रस्त्याची साधी डागडुजीही नसल्यानेनागरिकांना दररोज मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत असल्याने अपघातच प्रमाण वाढले असून, अपघात झाल्यास जिवीतहिनी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या मार्गावरून दररोज होणारी विद्यार्थी, शेतकरी, रुग्णवाहिका तसेच इतर वाहनांची वर्दळ सध्या मंदावली आहे. नादुरस्त रस्त्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून जो तो संताप व्यक्त करत आहे. हा मुख्य रस्ता वरील गावांना तालुक्याशी जोडतो त्यामुळे या रोडवर वाहनांची नेहमी वर्दळ असते.

सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या कामाकडे दुर्लक्ष करीत असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत अजूनही बांधकाम विभागाने ठोस पावले उचलले नसल्याचे स्पष्ट होत आहे. संबंधित प्रशासनाने रस्त्याची तातडीने पाहणी करून आवश्यक पाऊले उचलावी व काम सुरू करावे अशी मागणी होत आहे.

4/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 5 7 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे