द्रोणागिरी शासकीय औ. प्र.संस्था, उरण येथे ‘राष्ट्रीय युवा दिन’ उत्साहात
पोलीस उपनिरिक्षक नागनाथ कुठार यांच्या हस्ते वृक्षारोपण
द्रोणागिरी शासकीय औ. प्र.संस्था, उरण येथे ‘राष्ट्रीय युवा दिन’ उत्साहात
पोलीस उपनिरिक्षक नागनाथ कुठार यांच्या हस्ते वृक्षारोपण
जिल्हा प्रतिनिधी, रायगड
उरण (रायगड): (दि १२ जाने.) : राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जंयतीचे औचित्य साधून द्रोणागिरी शा.औ.प्र.संस्था, उरण येथे राष्ट्रीय युवा दिनाचे भव्य आयेजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबवून करण्यात आले. मा. अतिथींच्या हस्ते संस्था परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या उपक्रमासाठी PSI श्री. नागनाथ कुठार यांनी विविध झाडे उपलब्ध करुन दिली.
त्यानंतर मान्यवरांनी राष्ट्रीय युवा दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धाची पाहणी केली. मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मान्यवर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
E-प्रणालीव्दारे दिवप्रज्वलनाची नवीन संकल्पना या कार्यक्रमात सुरु करण्यात आली. त्यानंतर अतिथींचा फुलझाडांची सुंदर राप देवून सन्मान करण्यात आला. त्यानंतर सुत्रसंचालकांनी कार्यक्रमाची संकल्पना व प्रस्तावना मांडली. उपस्थित मान्यवरांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना युवा दिनाबाबत, भविष्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
संस्थेच्या मा. प्राचार्यांनी युवा दिनानिमित्त आफ्ले मनोगत व विद्यार्थ्यांच्या पुढीच वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर मा. पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर राज्यगीत व राष्ट्रगीताचे गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी IMC चे अध्यक्ष श्री. नागेश आकोडे Imc मेंबर मा.श्री. आर. आर.गायकवाड, मा. मोहन आव्हाड मुख्य अभियंता GTPS मा.श्री. नागनाथ कुठार PSI मोरा सागरी ठाणे, मा. श्री. एम्. व्ही. पिल्लने प्राचार्य औ प्र. संस्था उरण, संस्थेचे गट निदेशक श्री. कीर सर व श्री. देशमुख सर आणि संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.



