खड्डयांना त्रस्त होत मनसेने केले अनोखे आंदोलन
महाड एसटी बस स्थानकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बांधल्या चक्क म्हशी
खड्डयांना त्रस्त होत मनसेने केले अनोखे आंदोलन
महाड एसटी बस स्थानकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बांधल्या चक्क म्हशी
बस स्थानकात पडलेल्या खड्ड्याना वैतागून मनसेचे अनोखे आंदोलन
रायगड: महाड एसटी बस स्थानकात पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि दुर्गंधी युक्त परिसरामुळे प्रवासी वर्गात नाराजीचा सूर असताना महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाड एसटी प्रशासना विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा मागील काही दिवसांपूर्वी दिला होता.
त्याअनुषंगाने आज महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाड एसटी बस स्थानकातील खड्ड्यात चक्क म्हशी फिरवून बस स्थानकातच म्हशी बांधून प्रशासनाचे लक्ष वेधले, यामुळे सर्वांच्या नजरा या आंदोलनाकडे लागल्या होत्या. चक्क म्हशींना या बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यात बसवून मनसैनिकानी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलने केले आहे.
आंदोलना दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या सह महाड शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
