Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

हिंगण्यात पेट्रोल आटलं; पंपावर पहाटेपासून लांबच लांंब रांगा

मॉर्निंग वॉक' साठी बाईक हातात घेऊन नागरिक पंपाच्या दिशेने

0 5 2 4 6 3

हिंगण्यात पेट्रोल आटलं; पंपावर पहाटेपासून लांबच लांंब रांगा

‘मॉर्निंग वॉक’ साठी बाईक हातात घेऊन नागरिक पंपाच्या दिशेने

साडे नऊ पासून पेट्रोल वाटप सुरू ..!!

हिंगणा शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

हिंगणा: (दि २५ मार्च) नागपूर जिल्ह्यात सर्वदूर पाहता प्रत्येक पेटकरोल पंपावर रांगाच रांगा आणि तोबा गर्दी दिसून येत आहे. तर हिंगणा शहरापासून मोंढा सावंगी कडे जाणा-या पांजरी येथे असलेल्या ‘इंडीयन अॉईल’ च्या पेट्रोल पंपावर आज पहाटेपासूनच गर्दी व्हायला सुरू झाली.

पंप मालकाने आज ९.३० ला टँकर येणार असून पेट्रोल वाटप सुरू होणार असल्याची वार्ता गावभर पसरली. तसतसे नागरिक मॉर्निंग वाक ला जातांना बाईकसह रांगेत लागले. दुपार सरूनही गर्दी कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. एका व्यक्तीस फक्त रू १०० चे पेट्रोल देण्यात येत असून नागरिकांची सर्वत्र बोंब सुरू आहे.

हिंगण्यातील मुख्य पेट्रोल पंप म्हणजेच पंचवटी पेट्रोल पंप रात्रीपासून बंद करण्यात आले आहे तर, दुसरीकडे नायरा पेट्रोल पंपावर एक किमी पर्यंत लांबच लांब रांगा दिसून आल्यात. प्रशासन म्हणतेय मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. परंतु परिस्थिती काही औरच असल्याचे संपूर्ण शहरात चित्र सारखेच आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 6 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे