चित्रपट स्तंभामुळे भगत वाचकप्रिय ठरले : सुधीर पाठक
श्रमिक पत्रकार संघात शशीकुमार भगत यांना श्रद्धांजली
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर, (दि १४ फेब्रुवारी) स्व. शशिकुमार भगत यांनी चालविलेला “चित्रपटांवर ओझरती नजर” हा स्तंभ अतिशय वाचकप्रिय ठरला होता, अशी आठवण तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक यांनी सांगितली. नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.
विश्वास इंदूरकर म्हणाले की, भगत पत्रकार संघाचे अध्यक्ष असतानाच नवीन पत्रकारभवनाची पायाभरणी करण्यात आली. कारण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक लाख रुपयांची देणगी देऊन या नूतनीकरणाला चालना दिली होती.
पत्रकार भवन ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रभाकर दुपारे, गणेश शिरोळे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. विनोद देशमुख यांनी शोकसभेचे संचालन केले. यावेळी श्रीमती मीना भगत, कन्या केतकी आणि पत्रकार उपस्थित होते.



