Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरसाहित्यगंध

माझी दिवाळी

डॉ.पद्मा जाधव-वाखुरे छत्रपती संभाजीनगर

0 6 3 9 6 2

माझी दिवाळी

माझी दिवाळी
त्या अनाथांसाठी
नाही कुणी वाली
ज्यांचे अश्रू पुसण्यासाठी

माझी दिवाळी
त्या निराश्रीतांसाठी
भटकंती ज्यांची सदैव
ऊब मायेची शोधण्यासाठी

माझी दिवाळी
त्या वृद्धांसाठी
जे सतत शोधताहेत
आधाराची काठी

माझी दिवाळी
त्या दुष्काळ ग्रस्तांसाठी
सुखाचा गोड घास
भरण्या त्यांच्या पोटी

माझी दिवाळी
त्या गोरगरिबांसाठी
ज्यांच्या नशिबी वणवण
जीव जगवण्यासाठी

माझी दिवाळी
त्या सैनिकांसाठी
घेतले प्रण ज्यांनी
आजन्म देशसेवेसाठी

माझी दिवाळी
माझा परमानंद
या साऱ्यांचा आनंद
द्विगुणित करण्यासाठी

डॉ.पद्मा जाधव-वाखुरे
छत्रपती संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 9 6 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे