0
4
8
2
9
0
शेतकरी राजा
काळ्या वावराच्या । मातीत कष्टतो
सोने पिकवितो । रात्रंदिन ॥१
उन्हातान्हात तो । गाळतोया घाम
घेई हाती काम । दिसभर ॥२
मातीच्या कुशीत । करतो पेरणी
चिंता दाटे मनी । सदोदीत ॥३
घरवाली संगे । सदा कष्ट करी
सुखाची भाकरी । तेव्हा मिळे ॥४
बायकोचा असे । फाटका पदर
कुणाला कदर । येत नसे ॥५
राही उपाशीच । पोट वितभर
चाले मरमर । जीवासाठी ॥६
समाधान मिळे । येता पिक हाती
धान्याच्या पोती । घरभर ॥७
दीपककुमार सरदार
ता.लोणार,जिल्हा बुलढाणा
0
4
8
2
9
0



