0
4
8
2
9
0
मनधरणी
नको नको म्हणताना
गेला मुला परदेशी
वाट पाहते सतत
येरे फिरून स्वदेशी
कसे निष्ठूर हृदय
गेला आईला सोडून
नाही सर्व काही पैसा
बघ विचार करून
तुझी रे मनधरणी
वारंवार मी करते
येई परत राजा तू
तुजविण मी झुरते
प्रेम नाही मिळणार
तुला आईविण कुठे
तुझ्या वाटेकडे डोळे
जाण हृदयी साकडे
तुच माझा आत्मा असे
तुच जीवन आधार
तुझ्याविणा जग सुने
जाण आईचा हुंकार
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
========
0
4
8
2
9
0



