0
4
8
2
9
3
माझी पाककला: हडसन पुरी
साहित्य: २वाट्या कणिक,१वाटी ज्वारीचे पीठ ,१वाटी चनाडाळीचे पीठ,२टोमॕटो,२कांदे,हिरवी मिरची व लसूणपेस्ट दोन चमचे,धनेजि-याची पूड एक चमचा, हळद,मीठ,एक वाटी चिरलेली कोथिंबीर, हडसनची पाने दोन वाटी तळण्यासाठी तेल इत्यादी.
कृती: सर्व पीठ परातीत घ्या. टोमॅटो व कांदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. वरील सर्व जिन्नस घालून घट्ट गोळा भिजवा. छोट्या पु-या लाटून तळा व लोणच्यासोबत खायला द्या गरमागरम हडसन पु-या.
टीप: पाऊस पडला की जंगलात हडसन भाजी उगवते.ती हाडांसाठी खूप चांगली असते.याची सुकी भाजी करून खाऊ शकतो. बाजारात विकायलाही येते.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
9
3



